💥परभणी जिल्ह्यात कोरोना महामारीची घौडदौड सुरूच; आज गुरूवारी आढळले ८२ कोरोनाबाधित रुग्ण....!


💥जिल्ह्यात आज रुग्णालयात उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू💥

परभणी (दि.११ मार्च) - शहरासह जिल्ह्यात आज गुरुवार दि.११ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ०६-०० वाजेपर्यंत ८२ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून रुग्णालयात उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे.रुग्णालयात औषधोपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या २९ व्यक्तींना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ३९४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.तर आजपर्यंत ३४० कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ९ हजार ९९ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ८ हजार ३६५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ३७ हजार ५६५ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख २७ हजार ८८७ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ८ हजार ९४६ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ५९२ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या