💥परभणी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतून उद्या दि.४ मार्च पासून मिळणार कोविडची लस...!


💥जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रातून गुरुवारपासून लस देण्यात येणार आहे💥

परभणी (दि.३ मार्च) - परभणी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातून ग्रामस्थांना कोविडची लस देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असून त्यावर आरोग्य विभागातर्फे उद्या गुरुवार दि.४ मार्च २०२१ पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

कोरोनावरिल लस जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम कोरोना योध्दे असलेल्या डॉक्टरांना सर्वप्रथम लस देण्यात आली. त्यापाठोपाठ ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना व ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील अनुषंगिक आजार असलेल्यांना कोविडची लस देण्यात येत आहे. या शिवाय खासगी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भार्त प्रधानमंत्री जनआरोग्य योजना इत्यादी अंतर्गत नोंदणीकृत आहेत. तेथे देखील कोवीड लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. त्यात परभणी शहरातील स्पर्श रुग्णालय, स्वाती क्रिटीकल केअर सेंटर, डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व मानवत येथील मानवत मल्टीस्पेशालिटी येथे २५० रुपयांत लस देण्यात येणार असल्याचेही आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे.

याचबरोबर आता जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातूनही ग्रामस्थांना कोविडची लस देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असून गुरूवारपासून आरोग्य प्रशासन त्यावर अंमलबजावणी करणार आहे. यात तालुक्यातील सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र, सेलू तालुक्यातील देऊळगाव गात, चिकलठाणा, मानवत तालुक्यातील कोल्हा, रामपुरी, पालम तालुक्यातील चाटोरी, रावराजूर, गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी, कोद्रई, महातपुरी, पूर्णा तालुक्यातील कावलगाव, ताडकळस, कंठेश्वर, पाथरी तालुक्यातील वाघाळा, पाथरगव्हाण, हादगाव, बाभुळगाव, परभणी तालुक्यातील जांब व जिंतूर तालुक्यातील चारठाणा अशा जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रातून गुरुवारपासून लस देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या