💥राज्यात कोव्हिशिल्डची नियोजित दुसरी मात्रा घेण्यासाठी लाभार्थ्यांची गर्दी....!


💥शास्त्रीय अहवालांचा दाखला देत सहा ते आठ आठवड्यांनी ही लस देण्याचा निर्णायक बदल💥

कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा २८ दिवसांऐवजी ४५ दिवसांनी देण्याचा निर्णय सोमवारी जाहीर झाल्यानंतरही त्याबाबत स्पष्ट सूचना देणारे संदेश लाभार्थ्यांना न गेल्यामुळे नियोजित दुसरी मात्रा घेण्यासाठी लाभार्थ्यांनी मंगळवारी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती अचानक बदललेल्या नियमांमुळे अनेक नागरिकांना परत जावे लागले कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा चार आठवड्यांनी दिली जात होती परंतु शास्त्रीय अहवालांचा दाखला देत सहा ते आठ आठवड्यांनी ही लस देण्याचा निर्णायक बदल सोमवारी केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केला. 

त्यानंतर राज्यानेही संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या, परंतु याची माहिती लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रावर पोहचल्यावर समजली काही लाभार्थ्यांना माध्यमांमधून समजले असले तरी खात्री करून घेण्यासाठी ते  केंद्रावर आले होते ऐनवेळी आलेल्या सूचनांनी गोंधळ सकाळपासून नियोजित दुसरी मात्रा घेणारे लाभार्थी येत आहेत दुसरी मात्रा घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास कसा फायदा आहे, हे आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि आणखी १५ दिवसांनी येण्याचा सल्ला देत आहोत.

 काहीजण ऐकतात आणि पुन्हा येऊ असे सांगून निघून जातात, परंतु काही जण तरीही ऐकत नाहीत, मग त्यांना लस द्यावी लागते, असे मुलुंड करोना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप आंग्रे यांनी सांगितले आम्हाला सूचना मिळाल्या. त्यामुळे आलेल्या लाभार्थ्यांना समजावून सांगण्याशिवाय आमच्याकडेही काही पर्याय नाही मंगळवारी तरी सर्वांना मोबाइलवर संदेश गेल्यास बुधवारी हा गोंधळ होणार नाही, असे मत वांद्रे कुर्ला संकुलातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या