💥पुणे जिल्ह्यातील दोघांची परभणी जिल्ह्यातील भामट्याने केली १४ लाख ८० हजार रुपयांना फसवणूक...!

 


💥उसने दिलेले ८० हजार रुपयें परत घेण्यास आले असता पैसे घेऊन येतो म्हणून १४ लाखाची कार घेऊन काढला पळ💥

पुर्णा (दि.५ मार्च) - पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र आळंदी येथील भेटी दरम्यान माऊली गुरुजी महाराज यास उसने दिलेले ८० हजार रुपयें वापस घेण्यास परभणी जिल्ह्यात टोयोटा इनिव्हा कार क्र.एम.एच.१२ एम.एल.०८०० घेऊन आलेल्या दोघांना माऊली गुरुजी या भामट्याने पुर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथे या पैसे देतो असे म्हणून बोलावून घेत त्यांच्याच कार मधे बसून पुर्णेतील नांदेड टि पॉईंट येथे गाडी थांबवण्यास सांगून पाच मिनिटांत पैसे घेऊन येतो असे म्हणून गाडी चालवत गाडी घेऊन निघून गेल्याची घटना काल गुरूवार दि.४ मार्च २०२१ रोजी १-०० वाजेच्या सुमारास घडली असून या घटने संदर्भात फिर्यादी सचिन रमेश टिळेकर वय वर्षे ३५ व्यवसाय शेतीसह गाडीचालक रा.भवरापूर पोस्ट कोरेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तब्बल १४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करून विश्वासघात केल्या प्रकरणी पुर्णा पोलिस स्थानकात आरोपी माऊली गुरुजी महाराज या भामट्या विरोधात गुरनं.९०/२०२१ कलम ४२०,४०६ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यत आला आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या