💥राज्यातील विरोधी पक्षाकडून जनतेची दिशाभूल; अन्वय नाईक कुटुंबीयांची पत्रकार परिषद...!


💥फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबलं असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला💥

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन गदारोळ घालण्यात आल्यानंतर सत्ताधारी नेत्यांकडून अन्वय नाईक प्रकऱणाचा उल्लेख करण्यात आला यामुळे पुन्हा एकदा अन्वय नाईक प्रकरण चर्चेत आलं असून फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबलं असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. 

यानंतर फडणवीसांनी मे.सुप्रीम कोर्टाचा दाखला देत गृहमंत्र्यां विरोधात हक्कभंग दाखल केला आहे या सर्व घडामोडींदरम्यान अन्वय नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षाकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला आहे फक्त श्रीमंतानाच न्याय मिळणार का ? अशी विचारणा अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईकने केली मे.सुप्रीम कोर्टाचा निकाल नाही तर फक्त जामीन दिला आहे लोकांची दिशाभूल करण्यात येत असून आमचा लढा अद्याप सुरु आहे असं सांगत यावेळी त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला, तसंच मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासलं असं म्हणणं योग्य वाटतं का ? अशी देखील विचारणा केली. 

आम्हाला ज्या धमक्या येत आहेत त्याचं काहीच नाही का? आम्हाला अद्यापही धमक्या दिल्या जात आहेत असं अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सांगितलं अर्णब गोस्वामी जेलमधून बाहेर पडल्यावर सर्वांसमोर धमकी देत होता, आम्हाला दोन दिवस झोप लागली नाही असं त्या म्हणाल्या आमची केस दाबली गेली असून त्याची चौकशी करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आमच्यावर हात टाकण्यात आला होता तेव्हाच्या तपास अधिकाऱ्याला कोणाचा आदेश होता हे देखील बाहेर काढावं मी आणि आई मनाचं काही सांगत नाही आहोत.आम्ही संशय व्यक्त करत नसून सुसाईड नोटमध्ये नाव देण्यात आलं आहे तपास अधिकाऱ्याला आमची चौकशी करण्याचा आदेश कोणी दिला होता ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या