💥परभणी जिल्ह्यात कोरोनाची सातत्याने उद्रेकाच्या दिशेनं वाटचाल...!


💥जिल्ह्यात आज बुधवार दि.१० मार्च रोजी आढळले ७९ कोरोनाबाधित रुग्ण तर २ कोरोनाबाधीतांचा मृत्यू💥

परभणी (दि.१० मार्च) - परभणी शहरासह जिल्ह्यात आज बुधवार दि.१० मार्च २०२१ रोजी सायंकाळी ६-०० वाजेपर्यंत ७९ कोरोना बाधीत आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा कमालीची सतर्क झाली असून जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत असून जिल्ह्यात कोरोनाची सातत्याने उद्रेकाच्या दिशेने वाटचाल होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष खबरदारी म्हणून प्रशासकीय निर्देशांचे पालन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.जिल्ह्यात आज बुधवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान २ कोरोनाबाधित पुरूषांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून रुग्णालयात औषधोपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या १५ व्यक्तींना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ३८५ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत ३३९ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ९ हजार १७ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ८ हजार २९३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ३६ हजार ४७९ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख २६ हजार ८८३ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ८ हजार ८६४ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५९२ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या