💥मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण; अखेर सचिन वझे यांची विशेष शाखेत बदली...!


💥गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांच्या बदलीची घोषणा केली होती अखेर वाझे यांची बदली करण्यात आली💥

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरील भारतीय जनता पार्टीने विधिमंडळ अधिवेशनात सरकारला धारेवर धरलं होतं हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल सवाल करतानाच मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते भाजपा कडून सातत्यानं मुद्दा लावून धरण्यात आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांच्या बदलीची घोषणा केली होती अखेर वाझे यांची बदली करण्यात आली आहे. 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली करण्यात आली आहे विशेष शाखा १ येथे यांची बदली करण्यात आली मनसुख हिरेन प्रकरणात वाझे यांच्यावर आरोप झाल्यानंतर तपास पारदर्शक व्हावा यासाठी बदली करण्यात येईल अशी माहिती देशमुख यांनी बदलीची घोषणा करताना दिली होती हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. 

हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आला असावा,असा प्राथमिक अंदाज शवचिकित्सा अहवालातून समोर आला होता त्याआधारे ए.टी.एस.ने तपास सुरू केला आहे कशी आहे वाझे यांची आतापर्यंतची कारकीर्द… मुंबई पोलीस दलातील सर्वच महत्त्वाच्या प्रकरणांचे तपास अधिकारी असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्तच ठरली आहे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली मोटार सापडल्याप्रकरणातही तपास अधिकारी असलेल्या वाझे यांच्या कथित संबंधांमुळे ते पुन्हा वादात सापडले आहेत १९९०च्या तुकडीतील वाझे यांनी आपली कारकिर्द गडचिरोलीतून सुरू केली अल्पावधीतच ते ठाण्यातील चकमकफेम अधिकारी ठरले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या