🔵परभणी जिल्ह्यातून औरंगाबाद-पुण्यासह नांदेड जाणारी प्रवासी वाहतुक २३ मार्च २०२१ पर्यंत बंद..!


🔴जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दिपक मुगळीकर यांनी केले आदेश जारी🔴

परभणी (दि.१५ मार्च) - जिल्ह्यात वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात साथरोग प्रतिबंध कायदा-१८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५ अन्वये परभणी जिल्ह्यातून पुणे-मुंबईकडे जाणारी व येणारी सर्व खाजगी बस वाहतुक उद्या मंगळवार दि.१६ मार्च ते २३ मार्च २०२१ पर्यंत बंद करण्यात आली आहे.तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसद्वारे परभणी जिल्ह्यातून औरंगाबाद व नांदेड येथे जाणारी व येणारी प्रवासी वाहतुक दि.१६ मार्च ते २३ मार्च २०२१ पर्यंत बंद करण्यात आली आहे. सदर प्रतिबंधातून पुर्व परवानगीने अत्यावश्यक सेवेस सुट देण्यात आलेली आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दिपक मुगळीकर यांनी जारी केले आहेत...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या