💥वादग्रस्त सचिन वाझे प्रकरणावरून किरीट सोमय्यांचा शरद पवारांना सवाल...!


💥किरीट सोमय्या म्हणाले, बेजबाबदार पणाची हद्द मी तुम्हाला सांगतो सचिन वाझे हा कोण एवढा महान आहे ?💥 

राज्यात सध्या मागील काही दिवसांपासून अतिशय चर्चेत असलेल्या ए.पी.आय. सचिन वाझे प्रकरणावरून  पुण्यात माध्यमांशी बोलताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक प्रश्न विचारला आहे तसेच, यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप करत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे किरीट सोमय्या म्हणाले, बेजबाबदार पणाची हद्द मी तुम्हाला सांगतो सचिन वाझे हा कोण एवढा महान आहे ? 

एका ए.पी.आय.साठी अजय मेहताच्या नेतृत्वात एक पुनरावलोकन समिती नेमली ज्यावेळी महाराष्ट्र १०० टक्के लॉकडाउनमध्ये होता जून महिन्यात सचिन वाझेंचं निलंबन रद्द करून त्याला पुन्हा कामावर घेतलं सचिन वाझे हा एक साधारण ए.पी.आय.आहे त्याच्यासाठी लॉकडाउनमध्ये अजय मेहताच्या नेतृत्वात समिती नेमली त्या समितीचा अहवाल आला, त्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली याचा अर्थ अनेक मोठी माणसं यामध्ये असेल कोणते कॅबिनेट मंत्री मंत्रालयात मागील पाच वर्षे धक्के खात होते ? 

मला शरद पवार यांना प्रश्न विचारायचा आहे ज्यावेळी ३ मार्च २००४ रोजी सचिन वाझे निलंबित झाले होते तेव्हा गृहमंत्री राष्ट्रवादीचेच होते त्यानंतर नोव्हेंबर २००७ मध्ये फेर याचिका फेटाळली होती त्यानंतर राजीनामा दिला तो स्वीकारला गेला तेव्हाही राष्ट्रवादीचे गृहमंत्री होते मग आता २०२० मध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांना सचिन वाझेमध्ये असं काय सापडलं ? की त्यांनी समिती नेमली आणि त्यांनी तो समितीचा अहवाल स्वीकारून त्यावर स्वाक्षरी केली असं किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या