💥परभणी जिल्ह्यात आज सोमवारी आढळले ३९२ कोरोनाबाधीत रुग्ण...!


💥जिल्ह्यात आज सोमवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू💥

परभणी (दि.२९ मार्च) - परभणी जिल्ह्यात सातत्याने स्फोटक परिस्थिती निर्माण होत असून जिल्ह्यात कोरोना महामारीचा उद्रेक यत्किंचितही थांबण्याचे नाव घेत नसून जिल्ह्यात सातत्याने कोरोना बाधीत रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सर्वत्र कोरोनाचा हाहाकार उडू लागला असून आज सोमवार दि.२९ मार्च २०२१ रोजी जिल्ह्यात तब्बल ३९२ कोरोनाबाधीत आढळले असून रुग्णालयात उपचारा दरम्यान ६ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. तर रुग्णालयात औषधोपचार घेऊन बरे झालेल्या १६६ कोरोनामुक्त व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात २ हजार ४१ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ३९९ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत १३ हजार ५८० कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ११ हजार १४० व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ६४ हजार ८८० व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ५० हजार ७१९ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर १३ हजार ४२७ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५९४ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या