💥परभणी जिल्ह्यात कोरोना धारण करीत आहे उग्ररूप; आज सोमवारी जिल्ह्यात आढळले ३१५ कोरोनाबाधीत रुग्ण....!


💥जिल्ह्यात रुग्णालयात उपचारा दरम्यान ३ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू💥

परभणी (दि.२२ मार्च) - परभणी जिल्ह्यात कोरोना महामारी दिवसेंदिवस उग्ररूप धारण करतांना पाहावयास मिळत असून जिल्ह्यात कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असतांना मात्र नागरिक मात्र कोरोनाला म्हणाव तितक गांभीर्याने घेत नसल्याने जिल्ह्यात सातत्याने रुग्ण संख्या वाढतांना दिसत असून आज सोमवार दि.२२ मार्च २०२१ रोजी जिल्ह्यात तब्बल ३१५ कोरोनाबाधीत आढळले असून रुग्णालयात उपचारा दरम्यान तिघा कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला. तर रुग्णालयात औषधोपचार घेऊन बरे झालेल्या ४५ कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ९८४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात आजपर्यंत ३५३ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आज पर्यंत ११ हजार ११ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ९ हजार ६७४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ५१ हजार २१८ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ३९ हजार ६२७ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर १० हजार ८५८ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५९३ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या