💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स....!


💥धाड टाकण्यासाठी आलेल्या एनसीबीच्या अधिकार्‍यांवर सोडले कुत्रे,मुंबईत 19 वर्षीय ड्रग्ज पेडलरला अटक💥 

 ✍️ मोहन चौकेकर 

1.परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, मुंबई हायकोर्टात जाण्याचा सल्ला 

2.मनसुख हिरण हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा ठाणे कोर्टाचा आदेश, एटीएसला तपास थांबवून सर्व दस्तावेज एएनआयकडे सोपवण्याचे निर्देश ; अँटीलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझेंचा सहकारी एपीआय काझी सरकारी साक्षीदार, एनआयएची विशेष कोर्टात माहिती

3.काँग्रेसला सत्तेमध्ये जेवढा हिस्सा आहे तेवढाच हफ्तावसुलीमध्येही आहे का? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसला सवाल ; राज्यातील भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला 

4. मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझे यांचा तब्बल 100 रात्रींचा मुक्काम, NIच्या तपासातून उघड 

5. महाराष्ट्र सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा संवैधानिक, केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन 

6.मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलेले अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह;त्यामुळे सर्वांना  चिंता  बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची लागण, सध्या होम क्वारंटाईनमध्ये, पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थिती 

7. बीड जिल्ह्यात पुन्हा दहा दिवसाचा लॉकडाऊन ; नांदेडमध्ये 4 एप्रिलपर्यंत कडकडीत लॉकडाऊन  तर परभणीत सात दिवसांची संचारबंदी 

8.धाड टाकण्यासाठी आलेल्या एनसीबीच्या अधिकार्‍यांवर सोडले कुत्रे, मुंबईत 19 वर्षीय ड्रग्ज पेडलरला अटक 

9.मुंबईकरांसाठी मोठी बातमी, लालबाग उड्डाणपूल आजपासून तीन महिने वाहतुकीसाठी बंद; रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत चालणार दुरुस्तीचं काम 

10 कोरोनामुळं यंदाही होळीचे रंग फिकेच, मुंबई, पुण्यात होळी, धुलिवंदन सण साजरा करण्यासाठीची नियमावली जारी http धुलिवंदन-रंगपंचमीसाठी पर्यटनस्थळी गेलात तर कारवाई 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या