💥परभणी जिल्हा स्थागुशाच्या पथकाने हिंगोली दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या....!


💥आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या ०२ चारचाकी वाहनासह स्थागुशाच्या पथकाने घेतले ताब्यात💥

परभणी (दि.१६ मार्च) परभणी जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आज मंगळवार दि.१६ मार्च २०२१ रोजी माहिती मिळाली की हिंगोली येथील ग्रामीण पोलिस स्थानकात दाखल गुरनं.५७/२१ कलम ३९५ भादवी अनुसार दाखल दरोडा प्रकरणातील आरोपी विनोद अशोक मस्के वय वर्ष २९ राहणार तळेगाव ता.घनसावंगी जिल्हा जालना हा पाथरी येथे फोर्ड कंपनीची पांढऱ्या रंगाची इकोफोर्ड वाहन क्र.एम.एच.- १३ बी एन - ०४४२ ही गाडी घेऊन येणार आहे अशी माहिती सपोनि.बंदखडकेने पोलिस स्टेशन हिंगोली ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार यांना दिल्याने त्यांनी पाथरी येथील सेलू कॉर्नर येथे सापळा लावून वरील वर्णनाची गाडीसह आरोपीस ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता त्याने हिंगोली येथे घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर आरोपीस गुन्ह्यामधील वापरलेल्या ०२ चारचाकी वाहनासह ताब्यात घेऊन पुढील चौकशी व कार्यवाही साठी हिंगोली येथील ग्रामीण पोलिस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हिंगोली दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली महिंद्रा कंपनीची गाडी क्र.एम.एच.- १२ व्हिजी.९९९९ या गाडीचे कागदपत्र तपासले असता तिचा आरटीओ पासींग क्र.एम.एच - २२ एडी - ७ असा असल्याने समजते सदर आरोपीने गाडीचा नंबर चोरी करण्याचे उद्देशाने त्याने बदलले आहे असे कबुलीत सांगितले आहे सदर कार्यवाही सहाय्यक पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे धाडसी पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार,पोलिस उपनिरिक्षक विश्वास खोले,पथकातील सहकारी पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ,शंकर गायकवाड,यशवंत वाघमारे,विष्णु भिसे,अजहर पटेल,दिपक मुदिराज,चालक अरूण कांबळे यांच्यासह सपोउपनि.राऊत,पो.कॉ.गिराम पाथरी व पोलिस स्टेशन हिंगोली ग्रामीणचे पोहेकॉ. वाटोरे व पोना.चव्हाण यांनी केली असून या धाडसी कारवाई संदर्भात पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना,अप्पर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अभिनंदन केले आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या