💥पुर्णेचे भुमीपुत्र अनिल रामभाऊ कांबळे यांचे पिएचडी पत्र परीक्षेत यश....!


💥मास्टर अनिल कांबळे यांच्या या यशा बद्दल त्यांचे मित्र परिवारा कडून अभिनंदन होत आहे💥

पूर्णा (दि.१९ मार्च) - पुर्णेचे भुमीपुत्र मास्टर अनिल रामभाऊ कांबळे यांनी नुकतीच डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अंतर्गत २०२१ मधे घेण्यात आलेल्या पिएचडी पत्र परीक्षेत यश संपादन केले आहे  

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी स्व.रामभाऊ कांबळे यांच्या परिवारातील अनिल रामभाऊ कांबळे हे पाचवे पिएचडी करणारे ठरले आहेत या अगोदर डॉ.दयानंद कांबळे,डॉ.अरविंद कांबळे यांनी पिएचडी पूर्ण केली व उज्वला अनिल कांबळे व राहुल कांबळे हे सद्या पिएचडी करत आहेत तर २०२१ यावर्षी मास्टर अनिल कांबळे यांनी शारीरिक शिक्षण या विषयात पिएचडी पात्र परिक्षा पास केली आहे. 

मास्टर अनिल कांबळे यांच्या या यशा बदल मा.नगराध्यक्ष मोहन मोरे, डॉ.भदंन्त उपगुप्त महाथेरो,डॉ भुताळे ,कैलाश कापसे डॉ गंगाधर कांबळे,अशोक धबाले,पत्रकार जगदीश जोगदंड पत्रकार दिनेश चौधरी आणि पूर्णा शहर व तालुका परिसरातून मित्र परिवारा काढून  त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या