💥६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात यावेळी मराठीचा बोलबाला.....!


💥‘आनंदी गोपाळ’,’बार्डो’ या सिनेमांनंतर ‘खिसा’ या लुघपटाचीदेखील राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये वर्णी💥

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात यावेळी मराठीचा बोलबाला पहायला मिळाला ‘आनंदी गोपाळ’,’बार्डो’ या सिनेमांनंतर ‘खिसा’ या लुघपटाचीदेखील राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये वर्णी लागली ‘खिसा’ या लघुपटाने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात नॉन फिचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण पुरस्कार पटकावला आहे. 

या लघुपटाचं दिग्दर्शन राज मोरे यांनी केलं असून लेखन कैलास वाघमारे यांनी केलं आहे आतापर्यंत ‘खिसा’ या लघुपटाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे हा लघुपट खेडेगावातील संकुचित दृष्टिकोनावर भाष्य करणारा असून एका लहान मुलाची मन हेलावून टाकणारी ही कथा आहे. 


या लघुपटात कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, श्रुती मधीदीप, डॉ. शेषपाल गणवीर आणि वेदांत श्रीसागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ‘खिसा’चे दिग्दर्शक राज मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, ”आपल्या सर्वांनाच माहित आहे, की वर्षभरात ‘खिसा’ जगभर गाजतोय. 

जगभरातील अनेक मोठमोठ्या फिल्मफेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रिमिअरचा बहुमान पटकावल्यानंतर भारतातही ‘खिसा’ने अनेक फिल्म फेस्टिवलवर आपली मोहोर उमटवली आणि आता तर राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले त्यामुळे माझ्यासाठी ही खूपच आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे ‘खिसा’साठी नॉन फिचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण पुरस्कार मला मिळाला आहे. 

मात्र हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तो संपूर्ण टीमला मिळाला आहे कारण त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हते त्यामुळे सगळ्या ज्युरींसह मी संपूर्ण टीमचेसुद्धा आभार मानतो एवढा मानाचा पुरस्कार मिळाल्याने आता जबाबदारीही तितकीच वाढली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या