💥राज्याचे मा.पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आठवडाभरापूर्वी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही करोनाची लागण...!


💥रामदास कदम यांनीच आपल्या अधिकृत सोशल नेटवर्किंग पेजवरुन यासंदर्भातील माहिती दिली💥 

मुंबई ; शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना करोनाची बाधा झाली आहे रामदास कदम यांनीच आपल्या अधिकृत सोशल नेटवर्किंग पेजवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे प्रकृती ठीक वाटत नसल्याने कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे असं रामदास कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झालो आहे असंही रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे. 

तसेच ”आता सर्व काही ठीक असून योग्य ते उपचार सुरू आहेत,”असंही कदम यांनी आपल्या समर्थकांना पोस्टमधून सांगितलं आहे पोस्टच्या शेवटी कदम यांनी सर्वांना काळजी घेण्याचा सल्ला दिलाय तसेच कदम यांनी सर्वांना त्रिसूत्रीचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे त्रिसूत्रीमध्ये मास्क घालणे, हात सतत धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टींचा समावेश होतो विशेष म्हणजे रामदास कदम यांनी २२ तारखेला करोना लसीचा पाहिला डोस घेतला होता तरी त्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. 

कोरोना प्रतिबंधक लस घेतली कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल अनेक लोकांच्या मनात गैरसमज असल्याचे दिसून येते परंतु हे लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे आपले आणि कुटुंबीयांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपणही लवकरात लवकर लस घ्यावी ही विनंती,”असं रामदास कदम यांनी  केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं याच पोस्टमध्ये त्यांनी “लसीकरणानंतरही मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व सतत हात धुणे या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन सर्वांनी करावे,” असंही आवाहन केलं होतं.रामदास कदम हे ५७ वर्षांचे आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या