💥औरंगाबाद पोलिसांनी घाईने तपास म्हणजे एकप्रकारे आरोपीला मदतच...!


💥मे.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने असे मत व्यक्त करीत नागपूर-औरंगाबाद पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश💥

नागपुर - एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या शहरांत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला या गुन्ह्याचा तपास नागपूर पोलिसांनी औरंगाबाद पोलिसांकडे वर्ग केला परंतु कोणत्या आधारावर या गुन्ह्याचा तपास वर्ग करण्यात आला असा प्रश्न उपस्थित करून औरंगाबाद पोलिसांनी घाईने तपास करून दोषारोपपत्र दाखल करणे म्हणजे एकप्रकारे आरोपीला मदतच करणे होय, असे मत मे.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले

याप्रकरणी नागपूर व औरंगाबाद पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेशही दिले.२६ वर्षीय पीडित तरुणीने २३ ऑक्टोबर २०१९ ला नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी सौरभ संतोष तिवारी रा. सातारा, औरंगाबाद याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप होता. 

त्याने औरंगाबाद, पुणे आणि नागपुरातील वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचे तक्रारदार तरुणीचे म्हणणे होते पहिली घटना औरंगाबाद येथे घडल्याने परिमंडळ-५ च्या पोलीस उपायुक्तांनी २४ ऑक्टोबर २०२० ला तपास औरंगाबाद शहराकडे वर्ग केला. त्या प्रकरणी सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला २४ डिसेंबर २०२० ला मे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले या प्रकरणी आरोपीने अटकपूर्व जामीन मिळवला.

या प्रकरणात पीडितेने मे.उच्च न्यायालयात धाव घेऊन प्रकरणाचा तपास योग्यपणे करण्यात आला नसल्याचा दावा केला या याचिकेवर न्या सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घारोटे यांच्यासमोर सुनावणी झाली या वेळी मे.न्यायालयाने औरंगाबाद पोलिसांना तपासाची माहिती विचारली असता त्यांनी तक्रारदार महिलेने तपासात सहकार्य न केल्याचा दावा केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या