💥परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात गारांचा तुफान पाऊस...!


💥शेतकरी बांधवांनो सावधान; हवामान खात्याचा अंदाज खरा ठरतोय💥 

परभणी (दि.१९ मार्च) - जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव ते वडगावच्या परिसरात आज शुक्रवार दि.१९ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ६-०० ते ७-०० वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व गारांसह मुसळधार पाऊस झाल्याने शेवटी हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरतांना दिसत असून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो सावधान राहा व नुकसान टाळण्यासाठी तात्काळ रब्बी पिकांची कापणी करून कापलेली पिक झाकून ठेवावा असे कृषी खात्याकडून इशारा देण्यात आला आहे. 


गंगाखेड-परळी या रस्त्यावरील सोनपेठ हद्दीतील उक्कडगाव पासून,नैकोटवाडी,करम, ते गंगाखेड पासून दहा किलोमीटर अंतरावरील वडगावपर्यंत पाऊस सुरू होता. तब्बल तीस मिनिटे तास वादळी वारे, गारांचा पाऊस सुरू होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या