💥सचिन वाझेंना आधी निलंबित करा ; हिरेन प्रकरणावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ....!

  


💥विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मृत्यू प्रकरणावरून ठाकरे सरकारला धरले धारेवर💥 

✍️ मोहन  चौकेकर

 मुंबई : अंबानी स्फोटकं प्रकरणात आढळून आलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन याचा यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता या मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मृत्यू प्रकरणावरून ठाकरे सरकारला धारेवर धरले त्याचबरोबर हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा दाखल देत सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केल्याचं म्हटलं त्यामुळे सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणीही भाजपानं लावून धरली त्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. 

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले वाझे यांना अद्याप अटक का ? करण्यात आलेली नाही असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला “हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या दाव्यानुसार एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केला असून, या प्रकरणी वाझे यांना अटक करा,” अशी मागणी फडणवीस यांनी केली. 

यावेळी फडणवीस यांनी त्यांची तक्रारही वाचून दाखवली फडणवीसांचा गंभीर आरोप त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं देशमुख म्हणाले, “२५ फेब्रुवारी रोजी जी घटना घडली आहे मनसुख हिरेन यांची घटना दुर्दैवी आहे स्कॉर्पिओ गाडी सापडली हिरेन यांची हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू आहे स्फोटकं प्रकरणाचा तपास एन.आय.ए. करत आहे हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मयताच्या पत्नीने जी तक्रार दिलेली आहे ती सगळीकडे प्रसिद्ध झाली आहे ए.टी.एस. याचा तपास करेल विरोधी पक्षाकडे जास्तीचे पुरावे असतील, तर त्यांनी तपास यंत्रणांना द्यावेत... 

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या