💥परभणी जिल्ह्यात आज शनिवारी कोरोनाचा पुन्हा उद्रेक; जिल्ह्यात आढळले ८४ कोरोनाबाधित रुग्ण...!


💥जिल्ह्यात आज रुग्णालयात उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू💥

परभणी (दि.६ मार्च) - परभणी शहरासह जिल्ह्यात आज शनिवार दि.६ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ६-०० वाजेपर्यंत ८४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज रुग्णालयात उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधित पुरूषाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून रुग्णालयात औषधोपचार घेऊन बरे झालेल्या ६४ कोरोनामुक्त व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ११७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.आजपर्यंत ३३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार ८४० कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ८ हजार ३९२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ३३ हजार ९६५ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख २४ हजार ५४६ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ८ हजार ६८७ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५९२ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या