💥उत्तर प्रदेशातील मोहनलालगंजचे खासदार कौशल किशोर यांच्या सुनेन हाताची नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न...!


💥“जगण्यात काहीच अर्थ नाहीय,कोणावरही प्रेम करुन नका”असे लिहून केला आत्महत्येचा प्रयत्न💥 

उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज मधून भारतीय जनता पार्टीचे खासदार असणाऱ्या कौशल किशोर यांच्या सुनेनं म्हणजेच अंकिता किशोरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय खासदार किशोर यांच्या घरासमोरच अंकिताने आपल्या हाताची नस कापली पोलिसांनी तातडीने अंकिताला जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखलं केलं वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला असून तिच्या जिवाला आता कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी अंकिताने एक व्हि.डी.ओ.पोस्ट केला होता हा व्हि.डी.ओ.चांगलाच व्हायरल झाला होता. 

यामध्ये अंकिताने पती आयुषवर गंभीर आरोप केले होते आपली फसवणूक झाल्याचेही अंकिताने या व्हि.डी.ओ.मध्ये म्हटलं होतं रुग्णालयामध्ये अंकिताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मी आयुषच्या घरासमोरच ब्लेडने माझी नस कापल्याची कबुली दिली आहे मी नस कापली तेव्हा तिचा पती आयुष आणि अंकिताची सासू अंगणामध्ये फेऱ्या मारत होते कोणीही मला आडवण्याचा प्रयत्न केला नाही. 

तब्बल दिड तासानंतर पोलीस घटनास्थळी आले असा अरोप अंकिताने केला आहे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अंकिता रडताना दिसून येत आहे अंकिताने पोलीस आणि आयुषच्या घरच्यांवर गंभीर आरोप या व्हि.डी.ओ.मधून केले आहेत आयुष माझ्याकडे पुन्हा येईल याची मी कधी पासून वाटत पाहत होते. आयुष माहिला कार्यालयामध्ये गेला होता. मी त्याला भेटण्यासाठी तिथे गेले तर पोलिसांनी तो आला नाहीय असं सांगून मला बाहेर काढलं. सर्वजणांचे एकमेकांशी साटंलोटं आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या