💥परभणी जिल्ह्यात रास्ता रोकोसह मोर्चे निदर्शनांवर येत्या १५ मार्च २०२१ पर्यंत बंदी...!


💥जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काढले आदेश💥

परभणी (दि.०५ मार्च) - जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष,संघटनांच्या मोर्चे,निदर्शने, रास्तारोको, उपोषणे व अन्य सर्व प्रकारच्या आंदोलनांवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी येत्या १५ मार्च २०२१ पर्यंत निर्बंध जारी केल्याचे आदेश दिले.

सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना संसर्गात होणार वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे नमूद करीत जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटना यांच्याकडून आयोजित करण्यात येणार्‍या मोर्चे, निदर्शने, रास्तारोको, उपोषण व सर्व प्रकारच्या आंदोलनांवर १५ मार्च २०२१ पर्यंत निर्बंध लावण्यात आले असल्याचे आदेश जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी काढले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या