💥परभणी जिल्ह्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर येत्या ३१ मार्च २०२१ पर्यंत अनेक गोष्टीवर निर्बंध...!


💥आज शुक्रवार दि.१२ मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काढले💥 

परभणी (दि.१२ मार्च) - जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यातील आठवडी बाजार येत्या ३१ मार्च २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आज शुक्रवार दि.१२ मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काढले आहेत. 

जिल्ह्यातील विविध पक्ष,संघटना यांच्याकडून आयोजीत करण्यात येणारे मोर्चे,निदर्शने,रास्तारोको,उपोषण व सर्व प्रकारची आंदोलने आदीवर दि.३१ मार्च २०२१ पर्यंत निर्बंध लावले आहेत. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्याच्या कालावधीत वाढ करून दि.३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत तर यवतमाळ,अकोला, अमरावती आदी जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातून येणाऱ्या  कोरोनाबाधित रुग्णाकडून संपर्कात आलेल्या व्यक्ती मार्फत कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव जिल्ह्यात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक व त्यांचे आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो. जिल्ह्यात कोरोना संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विदर्भातील जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येणा-या व परभणी जिल्ह्यातून विदर्भातील जिल्ह्यात जाणा-या व्यक्ती, वाहनास जिल्ह्यात अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यात ३१ मार्च पर्यंत जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी एका आदेशाद्वारे मनाई केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या