💥तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती कमी झाल्याने इंधनाच्या दरांत सलग दुसऱ्या दिवशी कपात....!


💥मुंबईतील पेट्रोलचे दर ९७.४० रुपयांवरून ९७.१९ रुपयांवर, तर डिझेलचे दर ८८.४२ रुपयांवरून ८८.२० रुपयांवर आले💥

 तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती कमी झाल्याने पेट्रोल व डिझेलच्या दरांत सलग दुसऱ्या दिवशी कपात करण्यात आली त्यानुसार पेट्रोलचे दर लिटरला २१ पैशांनी, तर डिझेलचे दर २० पैशांनी कमी करण्यात आल्याचे सरकारी किरकोळ इंधन विक्रेत्या कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे मुंबईतील पेट्रोलचे दर ९७.४० रुपयांवरून ९७.१९ रुपयांवर, तर डिझेलचे दर ८८.४२ रुपयांवरून ८८.२० रुपयांवर आले आहेत. 

दिल्लीत आता पेट्रोल ९०.७८ रुपये लिटर, तर डिझेल ८१.१० रुपये या दराने मिळेल यापूर्वी गेल्या सहा महिन्यांत पहिल्यांदाच करण्यात आलेल्या दर कपातीनुसार बुधवारी पेट्रोलचे दर लिटरला १८ पैशांनी, तर डिझेलचे दर १७ पैशांनी कमी करण्यात आले होते दर स्थिर ठेवण्याची मागणी वाढत असूनही, सरकारने गेल्या वर्षी मार्चमध्ये उत्पादन शुल्कात वाढ केल्यापासून पेट्रोलचे दर विक्रमी, म्हणजे लिटरमागे २१.५८ रुपयांनी, तर डिझेलचे दर लिटरमागे १९.१८ रुपयांनी वाढले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या