💥गुन्हा दाखल झाल्यावर देवेंद्र फडणवीस घाबरलेत...?


💥राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे💥

वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती शुक्ला यांच्या अहवालावर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केल्यानंतर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पुन्हा लक्ष्य केलं होतं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी हा अहवाल तयार केल्याचं फडणवीस म्हणाले होते फडणवीस यांच्या आरोपांना राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा अहवाल नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला, असं देवेंद्र फडणवीस सांगत आहेत मात्र ते स्वतः रश्मी शुक्लांच्या पत्राचा आधारावर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर आरोप करत होते मुंबईतही पत्रकार परिषद घेतली आणि बदल्यांमध्ये पैसे खाल्ले असे आरोप करत होते केंद्रीय गृह सचिवांना व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही ते भेटले फडणवीसांचे आरोप चुकीचे असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाल्याने जवळचे व्यक्ती अडचणीत येतील म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरले”, असा आरोप मलिक यांनी केला आहे. 

“मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी सांगितलेला रश्मी शुक्लांचा अहवाल काय आहे ? बेकायदेशीर फोन टॅपिंग केले रश्मी शुक्लांचा रिपोर्ट येईपर्यंत कुठल्याही अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या नंतरच्या काळात काही बदल्या झाल्या असं ते सांगत आहेत त्यात १२ नावं आहेत मात्र महाराष्ट्र पोलीस दलामध्ये बदल्या होत राहतात पोलीस बोर्डाच्या अध्यक्षतेखाली या बदल्या होतात...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या