💥राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्यासह त्यांचे कुटूंबीय कोरोना पॉझिटिव्ह...!


💥सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत💥

परभणी (दि.११ मार्च) - जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर व त्यांचे कुटूंबिय हे केलेल्या कोरोना चाचणीतून कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

आमदार सुरेश वरपुडकर यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आज गुरुवार दि.११ मार्च २०२१ रोजी दुपारी याबाबत अधिकृत माहिती दिली त्यानी यावेळी असे नमूद केले की माझी पत्नी सौ.मीना वरपुडकर यांची कोरोना चाचणी केली आसता त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आल्यामुळे माझ्या कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी केली. त्यात आपण स्वतः स्नूषा सौ.प्रेरणा समशेर वरपुडकर व नातू युद्धराज असे आम्ही चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे नमूद केले आहे. तसेच दुसरा नातू रणवीर व मुलगा समशेर वरपुडकर हे मागील काही दिवसांपासून आमच्या संपर्कात नसल्याने त्यांना सुदैवाने कोरोनाची लागण झाली नसल्याचेही त्यांनी त्यात म्हटले आहे.

दरम्यान, सर्वांची प्रकृती स्थिर असून व आम्ही उपचार घेत असल्याचेही म्हटले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या