💥परभणी जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रकोप सुरूच ७ दिवसात ३५ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू....!


💥संचारबंदी दरम्यान रस्त्यावरून नागरिकांचा मुक्तसंचार दिसू लागल्याने संचारबंदीबाबत प्रश्नचिन्ह ?💥

परभणी (दि.२७ मार्च) - परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून दररोज शेकडोच्या संख्येने कोरोनाबाधित आढळू लागले आहेत. याहीपेक्षा भयावह बाब म्हणजे या आठवड्यात रुग्णालयात उपचारा दरम्यान ३५ कोरोनाबाधित व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागल्याने प्रशासनासह सर्वसामान्य जनतेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी, कोरोनाची वाढत असलेली साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी बुधवार दि.२४ मार्च २०२१ चे सायंकाळी सातपासून अत्यावश्यक सेवा वगळता लागू केलेल्या संचारबंदी दरम्यान रस्त्यावरून नागरिकांचा मुक्तसंचार दिसू लागल्याने संचारबंदीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.

परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दररोज दोनशे ते तिनशे कोरोनाबाधीत आढळू लागले आहेत. याहीपेक्षा भयावह बाब म्हणजे कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूची संख्याही वाढू लागल्याने मोठी चिंता व्यक्त होऊ लागली आहे. शनिवारी आठ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली. मागील रविवार दि.२१ मार्च २०२१ रोजी २ व्यक्तींचा,तर सोमवार दि.२२ मार्च २०२१ रोजी ३ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारपासून कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. मंगळवार दि.२३ मार्च २०२१ रोजी ५,बुधवार दि.२४ मार्च २०२१ रोजी ६,गुरूवार दि.२५ मार्च २०२१ रोजी ५, शुक्रवार दि.२६ मार्च २०२१ रोजी ६ व्यक्तींचा मृत्यू झाला मागील रविवार दि.२१ मार्च पासून ते आज शनिवार दि.२७ मार्च पर्यंत या सात दिवसात ३५ कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

💥संचारबंदीत दुकाने बंद,नागरिकांचा मुक्तसंचार💥

कोरोनाची ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उपाययोजनांचा एक भाग म्हणून संचारबंदीचा निर्णय लागू केला आहे. आरटीपीसीआर चाचणीतून दररोज शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. वाढत असलेल्या रुग्ण संख्येस कुठेतरी रोख बसावा, कोरोनाची साखळी तुटावी या उद्देशाने उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी सातपासून ते एक एप्रिलच्या सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. शहरातील बाजारपेठेसह छोटी-मोठी सर्वच दुकाने बंद होती. हॉटेलधारकांनीही केवळ पार्सल देता येईल, एवढेच आपले हॉटेल सुरू ठेवल्याचे दिसून आले. पानटपरी, चहाचेहॉटेल आदी तर मागील आठ दिवसांपासून बंदच आहेत. या शिवाय एसटी महामंडळाची सेवाही ठप्प असल्याने महामार्ग म्हणून ओळखल्या जाणार्या वसमत रस्त्यावर मोठा शुकशुकाट दिसून आला. परभणी बसस्थानकातही कोणीच नव्हते. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार एसटीसेवाही बंद असल्याने जिल्ह्यातील सर्व एसटी बसेस त्या-त्या आगारात असल्याने परजिल्ह्यातील एसटीही दाखल झालेली दिसून आली नाही. एकूणच संचारबंदीस नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला असल्याचे दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या