💥भाजपा नेते तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन....!


💥गांधी यांनी 3 वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते💥

माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीत खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे गांधी यांनी 3 वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते.

दरम्यान केंद्रीय आराेग्य मंत्री हर्षवर्धन गाेयल यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून तसेच हाॅस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्याही सूचनाही केल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या