💥गुजरातच्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर आरोप करणारे आय.पी.एस.अधिकारी संजीव भट्ट जेलमध्ये…!


💥परमबीर सिंह मे.कोर्ट फिरतायत आणि भक्त लोकशाहीवर ज्ञान पाजळतायत💥

 मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यानंतर वरीष्ठ आय.पी.एस. अधिकारी परमबीर सिंह यांनी ठाकरे सरकारवरच लेटरबॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रामध्ये सिंह यांनी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यानंतर लगेचच त्यांनी थेट मे.सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करत आपल्या बदलीच्या निर्णयाला आवाहन दिलं आहे. 

सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे मात्र याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी ट्विटरवरुन अप्रत्यक्षपणे भा.ज.पा.वर निशाणा साधाला आहे भाई जगताप यांनी गुजरातमधील संजीव भट्ट प्रकरणाचा संदर्भ देत एक ट्विट केलं आहे.“गुजरातच्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर आरोप करणारे आय.पी.एस.संजीव भट्ट जेलमध्ये आहेत परमवीर सिंह मे.कोर्ट फिरतायत… 

आणि भक्त लोकशाही वर ज्ञान पाजळतायत..”असं ट्विट भाई जगताप यांनी केलं आहे गुजरातमधील निलंबित माजी आय.पी.एस. अधिकारी असणाऱ्या संजीव भट्टला २०१९ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे ताब्यात असणाऱ्या आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी मे. न्यायालयाने संजीव भट्टला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून तो सध्या तुरुंगामध्ये आहे. 

गुजरातच्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर आरोप करणारे आय.पी.एस. संजीव भट्ट जेलमध्ये परमवीर सिंह मे.कोर्ट फिरतायत आणि भक्त लोकशाही वर ज्ञान पाजळतायत..राऊत यांनीही केला भट्टचा उल्लेख अशा प्रकारे संजीव भट्टचं नाव चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही  दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना संजीव भट्टचा उल्लेख केला होता....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या