💥सक्तीची वसुली तातडीने थांबवा अन्यथा वीज ग्राहकांच्या हक्कासाठी भाजपा तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला💥
✍️ मोहन चौकेकर
चिखली ; लॉक डाऊन काळातील वीज बिल माफ करू असे म्हणणाऱ्या तिघाडी सरकारने वीज बिल माफी तर दिली नाहीच उलट त्या थकीत विजबिलांवर व्याज लावून पठाणी वसुली सुरू केली आहे . ही सक्तीची वसुली तातडीने थांबवा अन्यथा वीज ग्राहकांच्या हक्कासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी आपल्या निवासस्थानी आयोजन पत्रकार परिषदेत दिला आहे.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की,गेल्या वर्षभरापासून नागरिक कोरोनामुळे त्रस्त आहे . कामधंदा काही नाही . सत्तेतील पक्षांच्या जाहीर नाम्यात 100 युनिट पर्यंत मोफत वीज देऊ असे म्हणणाऱ्यांच्या वल्गना सत्तेत येताच हवेत विरल्या . लॉक डाऊन काळातील वीज बिले सरासरीच्या अव्वाच्या सव्वा वाढीव बिले देऊन राज्य शासनच नागरिकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. लॉक डाऊन काळातील बिले माफ करू असे आश्वासन देऊन ही बिले माफ तर केली नाहीच परंतु बिले वाढीव दिली एव्हढेच नाही तर आता त्यावर व्याज आकारणी करून सरकारने राज्यात मोगलाई आणलेली आहे . वीज बिल न भरल्यास वीज जोडणी कट करून महावितरण कंपनी वीज ग्राहकांना ब्लॅकमेल करीत असल्याचा देखील आरोप आ सौ श्वेताताई महाले यांनी यावेळी बोलतांना केला आहे.
💥शासनाने सांगूनही वीज तोडणी सुरूच💥
गेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात कुणाची ही वीज जोडणी तोडल्या जाणार नाही असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. अर्थसंकल्प अधिवेशन संपताच महाविज वितरण कंपनीने घरगुती आणि कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करण्याची धडक मोहीम सुरू केली . वीज कनेक्शन कट करून बिल भरण्याची सक्ती करून वीज वितरण कंपनी नागरिकांना वेठीस धरत आहे. त्यामुळे या पुढे घरगुती असो व कृषीचे कोणतेही वीज कनेक्शन कट न करण्याची मागणी सुद्धा आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी या वेळी बोलताना केली आहे. या पत्रकार परिषदेस भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ सपकाळ व भाजपाचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख हे देखील उपस्थित होते....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या