💥गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी घेतला आज कोरोना कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस....!


💥जिल्हा शासकीय रुग्णालयत आ.डॉ.गुट्टे यांनी जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ.नागरगोजेंच्या उपस्थितीत घेतला डोस💥

गंगाखेड (दि.६ मार्च) - गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आज परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयत कोरोनाचा कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला. त्याप्रसंगी जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. नागरगोजे यांच्यासह इतर सहकारी डॉक्टर उपस्थित होते.

        यानंतर आ. रत्नाकर गुट्टे यांनी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व नागरिकांना पुढे येऊन लस घेण्याचे आवाहन केले. इतिहासातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी सर्व डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकांचे आभार मानले. 1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये 60 वर्षाहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणासाठी नागरिक को- विन 2.0 पोर्टलवरून किंवा आरोग्य सेतू सारख्या इतर ॲप वरून आपली नोंदणी करू शकतात. नागरिकांमध्ये लसीबाबत विश्‍वासाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी लस घ्यावी असे आव्हान आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी याप्रसंगी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या