💥वादग्रस्त पोलिस निरिक्षक सचिन वाझे अखेर मुंबई पोलीस दलातून निलंबित...!


💥मुंबई पोलीस जनसंपर्क अधिकारी एस.चैतन्य यांनी दिली माहिती💥 

अंबानी स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सचिन वाझे यांना आणखी एक झटका बसला आहे वाझे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे सध्या कोठडीत असलेल्या वाझे यांची एन.आय.ए.कडून चौकशी सुरू आहे. 

या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत सचिन वाझे यांना एन.आय.ए.कडून अटक करण्यात आलेली आहे अटक करण्यात आल्यानंतर त्यांना निलंबित करण्याची मागणी केली जात होती अंबानी स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांचं नाव समोर आलं होतं त्यानंतर हिरेन प्रकरणाचा तपास ए.टी.एस.कडे सोपवल्यानंतर वाझे यांनी अटकपूर्व जामीनासाठी मे.न्यायालयातही धाव घेतली होती मात्र त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. 

त्यानंतर एन.आय.ए.ने वाझे यांची चौकशी करत शनिवारी रात्री त्यांना अटक केली होती अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात वाझे यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा ‘एन.आय.ए.’कडून करण्यात आलेला असून ‘‘हे कृत्य वाझे यांनी कबूल केले आहे अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवणे अंबानी कुटुंबाला धमकावण्याचा कट त्यांनी एकट्याने रचलेला नाही या कटात अन्य व्यक्तीही सहभागी असाव्यात’’ असा संशय असल्याचे ‘एन.आय.ए.’कडून सांगण्यात आलं होतं त्यानंतर वाझे यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले मुंबई पोलीस जनसंपर्क अधिकारी एस. चैतन्य यांनी यांची माहिती दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या