💥पोलीस सेवेतील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बहिर्जी नाईक पुरस्काराने पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत साखरे सन्मानित.....!


💥पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील भुमिपुत्राच्या कर्तृत्वाला अख्खा जिल्हा करतोय सलाम💥

पुर्णा (दि.२ मार्च) - जिल्हा पोलीस दलात कार्यारत राहून पोलिस सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळीचे भूमिपुत्र व परभणी या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत सखाराम साखरे यांना सन्मानाचा बहर्जी नाईक पुरस्कार देऊन नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक निसार तांबोळी व जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. 2020 -21 या वर्षामध्ये जी वी शाखा परभणी येथे कार्यरत असताना अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून जिकरीची महत्वाची गोपनीय माहिती काढून कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली. त्यांच्या या चोख कामगिरीमुळे पोलिसांची प्रतिमा उंचावलेली आहे.

✍️अशाप्रकारे सन्मान पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.✍️

त्यांच्या या कामगिरीबद्दल गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामकिशन रौंदळे सचिव दशरथ साखरे, पिराजी साखरे, नरहरी साखरे, रघुनाथ साखरे, गुलाब खा पठाण माणिकराव रौंदळे, भगवान पाटील दिनाजी गव्हाणे धनगर टाकळी येथील पंचायत समिती   सदस्य गोरखनाथ साखरे, सरपंच शिवाजीराव साखरे, उपसरपंच शेरखान पठाण डॉक्टर गजानन साखरे, माजी पोलीस पाटील गणपत साखरे दतराव शेरकर राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल चे मुख्याध्यापक वामनराव पाटील ज्येष्ठ शिक्षक श्रीकांत हिवाळे, बीएन बेद्रे डी.सी. डुकरे, शेख आर आय एस आर मोरे एस आर सोळंके चंद्रकांत कुलकर्णी एम बी शेख रतन साखरे तुषार पाटील, कालिदास डुकरे, विनायक दुधाटे, एस पी मराले तुकाराम साखरे गंगाधर अंभोरे दैवशाला मेघ माले व गावकऱ्यांनी त्यांना हा सन्मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक स्वागत केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या