💥परभणी जिल्ह्यात आज रविवारी आढळले ८७ कोरोनाबाधीत रुग्ण...!


💥जिल्ह्यात आज रुग्णालयात उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू💥

परभणी (दि.१४ मार्च) - जिल्ह्यात आज रविवार दि.१४ मार्च २०२१ सायंकाळी ०६-०० वाजेपर्यंत ८७ व्यक्ती कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून जिल्ह्यात आज रुग्णालयात उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. 

जिल्ह्यात एकूण ३६१ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत ३४३ कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ९ हजार २७३ व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्या असून ८ हजार ५६९ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे.कोरोनामुक्त ३६ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ४० हजार ९५२ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ३१ हजार १०० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ९ हजार १२० व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५९२ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या