💥दहशतवाद विरोधी पथकाला यश; मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा गुंता सुटला...!


💥डिआयजी शिवदीप लांडे यांनी केली पोस्ट💥 


राज्यात एकीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापलेले असताना, आता दुसरीकडे एटीएसला मोठं यश मिळालं आहे मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे एटीएसचे डिआयजी शिवदीप लांडे यांनी एक विशेष फेसबुक पोस्ट करून माहिती दिली आहे.

शिवदीप लांडे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात अतिसंवेदनशील मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा गुंता सुटला आहे मी आपल्या संपूर्ण एटीएस पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांना मनापासून सॅल्यूट करतो, ज्यांनी मागील अनेक दिवसांपासून दिवसरात्र एक करून, या प्रकरणाचा न्यायपूर्णरित्या छडा लावला  ही केस माझ्या करिअरमधील आतापर्यंतच्या सर्वात कठीण केस पैकी एक होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या