💥पत्रकार सुध्दा कोरोना योद्धाच; पत्रकारांना ही मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी....!


💥भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे जनसंपर्क प्रमुख अजित संचेती यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली मागणी💥 


राज्यात कोरोना सारख्या महाभयंकर संकटाच्या काळात डॉक्टर,नर्स, आरोग्य कर्मचारी,पोलीस खाते,आशा वर्कर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आपले कार्य पार पाढले व पार पाडत आहेत त्यांना आपण कोरोना योध्दा म्हणून घोषित केले तसेच आपले पत्रकार बांधव व भगिनी यांनी ही आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळातील सर्व माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले या कोरोना महामारीत आपले कर्तव्य बजावतांना काही पत्रकारांनाही आपले प्राण गमवावे लागले त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण पत्रकारांना ही कोरोना योध्दा म्हणून घोषित करून त्यांना ही लस मोफत देण्याच्या दिशेने पावल उचलावी अशी मागणी भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे जनसंपर्क प्रमुख अजित संचेती यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली असून निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की राज्यात आता परत कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे, जसे आपण आता,डॉक्टर,नर्स,आरोग्य कर्मचारी,पोलीस खाते,आशा वर्कर यांना लस उपलब्ध करून दिली तशी पत्रकार कोरोना योध्दा यांना मोफत लस द्यावी असेही म्हटले आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या