💥मुंबईतील नालासोपारा येथे बॅगमध्ये सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह....!


💥त्यानंतर तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला💥

नालासोपारा येथे एका बॅगमध्ये ३० ते ३५ वयोगटातील महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडे श्रीराम नगर येथे मृतदेह असणारी ही बॅग सापडली आहे ही महिला नक्की कोण आहे ? तिची हत्या कोणी केली ? ही बॅग या ठिकाणी कोणी ठेवली ? याचा शोध तुळींज पोलीस घेत आहेत रात्री १०-३० वाजेच्या दरम्यान श्रीराम नगर येथील मुख्य रस्त्यालगत एक बॅग दिसून आली या काळ्या बॅगमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

 त्यानंतर तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला ही महिला कोण ? आणि तिची हत्या कोणी व का केला ? याचा पोलीस तपास करीत आहेत या परिसरामध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या