💥परभणी जिल्ह्यात आज गुरुवारी आढळले ४३ कोरोनाबाधीत रुग्णा....!


💥जिल्ह्यात आज उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधित रुग्णाचा झाला मृत्यू💥

परभणी (दि.४ मार्च २०२१) - परभणी शहरासह जिल्ह्यात आज गुरुवार दि.४ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत ४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर जिल्ह्यात उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला असून रुग्णालयात औषधोपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या ६४ व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ९८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात आजपर्यंत ३२८ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार ७०९  कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ८ हजार २८३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ३० हजार ९३० व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख २१ हजार ६४८ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ८ हजार ५५६ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५८६ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या