💥कोरोनाची प्रतिबंधक लस आता लहान मुलांसाठीही; ऑक्टोबर अखेरपर्यंत उपलब्ध होणार...!

 


💥मॉर्डना औषध कंपनीने 6 महिने ते 12 वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी सुरू केली आहे💥

वॉशिंग्टन (दि.17 मार्च) : कोरोना विषाणूंच्या संसर्गाच्या साथीमुळे संपूर्ण  जगभरात थैमान घातलेले आहे. मॉर्डना या औषध कंपनीने म्हटले आहे की , 6 महिने ते 12 वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी आमच्या कंपनीने कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी सुरू केली आहे.  ज्यामध्ये सुमारे 6750 स्वयंसेवकांचा समावेश असेल.  मॉडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बेन्सेल यांनी याबाबत माहिती दिली.  मॉडर्नाची लस सध्या बाजारात आहे आणि ती लोकांना दिली जात आहे जी किमान 18 वर्षे वयोगटाच्या पुढील लोकांसाठी आहे.

अमेरिका आणि कॅनडामध्ये चाचण्या सुरू झाल्या आहेत. जे तरुण मुलांमध्ये कोरोना लस तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. अमेरिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की , प्रौढांपेक्षा मुलांना कोरोना विषाणूंची बाधा होण्याची शक्यता कमी असते आणि मृत्यूदर ही काहीसा कमी असतो. बहुतेक संक्रमित मुलांना सौम्य लक्षणे असतात किंवा त्यांची लक्षणे नसतात. त्यांना संसर्ग झाल्यास मात्र विषाणू पसरविण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असू शकते. अशा परिस्थितीत मुलांसाठीही कोरोना प्रतिबंधक लस तयार केली जाणे महत्वाचे आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून संपूर्ण जगभरात अनेक कंपन्यांकडून कोरोना लस तयार केल्या गेल्या आहेत आणि जगभरातील लोकांना दिल्या जात आहेत. परंतु या  सर्व लसी 12 वर्षांखालील मुलांना दिली जाऊ शकत नाहीत. तथापि, अनेक कंपन्यांनी मुलांसाठी लस तयार करण्याविषयी  हालचाली सुरू केल्या आहेत.  मॉर्डर्ना व्यतिरिक्त सीरम इन्स्टिट्ययूट ऑफ इंडियानेही मुलांसाठी कोरोना लसीवर काम करण्याविषयी प्रयत्न सुरू करीत असल्याचे म्हटलेले आहे. यावर्षी ऑक्टोबरपर्यंत ही लस तयार होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या