💥सौदी अरेबियानं उलट भारतालाच सुनावलं आहे.“तुम्ही गेल्या वर्षी खरेदी केलेलं स्वस्तातलं तेल वापरा...!


💥ओपेककडून उत्पादन वाढवून कच्च्या तेलाच्या किंमती खाली येण्याची शक्यता सध्या तरी मावळली आहे💥

भारतात पेट्रोलचे रोज वाढणारे दर ही आता सर्व भारतीयांसाठी डोकेदुखी ठरली आहे सामान्यांचं आर्थिक गणित कोलमडू लागलं आहे त्यामुळे पेट्रोल दरवाढीसाठी एक महत्त्वाचं कारण ठरलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती कमी व्हाव्यात, यासाठी भारतानं O.P.E.C. या कच्चे तेल पुरवठा करणाऱ्या देशांच्या संघटनेकडे तेलाचं उत्पादन वाढवण्याची मागणी केली असता ओपेकचा प्रमुख घटक असलेल्या सौदी अरेबियानं उलट भारतालाच सुनावलं आहे.“तुम्ही गेल्या वर्षी खरेदी केलेलं स्वस्तातलं तेल वापरा”असं सौदीकडून भारताला सांगण्यात आलं आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ओपेककडून उत्पादन वाढवून कच्च्या तेलाच्या किंमती खाली येण्याची शक्यता सध्या तरी मावळली आहे. 


💥तेलाचं उत्पादन वाढवणार नाही..! 

कच्च्या तेलाचं उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या O.P.E.C. नं नुकत्याच झालेल्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये तेलाचं उत्पादन न वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे यावेळी भारताचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उत्पादनावर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याची मागणी ओपेक देशांकडे केली यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा वाढून त्याच्या किंमती कमी होतील आणि पर्यायाने भारतातील पेट्रोलचे भाव कमी होतील मात्र, ओपेक देशांनी भारताची ही मागणी फेटाळून लावली. 

💥“गेल्या वर्षीचं तेल वापरा..!

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलअजीझ बिन सलमान यांनी ओपेकच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताला वेगळाच सल्ला दिला आहे. “भारतानं त्यांच्या साठ्यांमधून गेल्या वर्षी अत्यंत स्वस्त दरात खरेदी केलेलं कच्चं तेल वापरा असं ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या