💥कोरोना लसीकरणासाठी मोफत वाहन सेवा नगरसेवक गोविंद देव्हडेंचा स्तुत्य उपक्रम....!


💥कोरोना लसीकरणासाठी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून देव्हडें यांची विशेष सेवा💥

चिखली : कोरोना महामारीत जनजागृती व लसीकरण मोहिमेत योगदान देण्यासाठी येथील नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वत:च्या वाहनाचा वापर करून नागरिकांना त्यांच्या घरापासून लसीकरण केंद्रापर्यंत मोफत ने-आण करण्याची जबाबदारी उचलली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

कोरोना लसीकरणासाठी आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून स्वत: देव्हडे वाहन चालवून व ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करीत आहेत. नागरिकांना लस देण्यासाठी लसीकरण केंद्रापर्यंत नेणे व लसीकरण झाल्यानंतर घरापर्यंत आणून सोडणे, असा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. आज रोजी वैद्यकीय शास्त्र  प्रगतीशील असल्यामुळे या विषाणू बद्दल लवकरच जाणून घेता आले. त्याचा फायदा या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी होणार आहे.  मात्र,  त्यासाठी स्वत:चे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.  लसीकरणामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते व आपण रोगापासून संपूर्ण सुरक्षित राहतो. या सर्व बाबी डोळ्यासमोर  ठेवून शासनाने सर्वप्रथम कोरोना लस ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी लसीकरण मोहिमेत भाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन नगर परिषद प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक गोविंद देव्हडे व प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका विमल देव्हडे यांनी केले आहे.

लसीकरण १०० टक्के सुरक्षित

आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी माझी आहे. सरकारने सुरू केलेले लसीकरण हे १०० टक्के सुरक्षित असून समाजात सामूहिक प्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी लसीकरण सहाय्यभूत ठरणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे व राष्ट्रहितसाठी आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन माजी नगराध्यक्षा  विमल रामदास देव्हडे यांनी यावेळी  केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या