💥उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरणी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणे कडून अटक...!


 💥त्यांच्या कोठडीची मागणी एन.आय.ए.कडून केली जाणार आहे💥

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत स्फोटकं सापडली होती या प्रकरणाचा तपास एन.आय.ए.कडून सुरू असून, यात मोठी कारवाई करण्यात आली आहे एन.आय.ए.कडून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. 

सचिन वाझे यांची सकाळपासून एन.आय.ए.कडून चौकशी सुरू होती १३ तास चाललेल्या चौकशीनंतर वाझे यांना अटक करण्यात आली असून, त्यांनीच अंबानींच्या घराजवळ गाडी उभी केली होती, असा आरोप एन.आय.ए.ने केला आहे त्यामुळे या प्रकरणाला आणखी नवीन वळण मिळालं आहे मे.सत्र न्यायालयाने फेटाळलेली अंतरिम अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावल्यानंतर वाझे यांच्यावर एन.आय.ए.ने कारवाई केली आहे. 


राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन.आय.ए.) सकाळपासून वाझे यांच्याकडे चौकशी केली अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कार मनसुख यांच्या ताब्यात होती त्यामुळे मनसुख यांची हत्या आणि त्यांच्या कारची चोरी ही प्रकरणे एकाच गुन्ह्याचे पैलू असल्याने एन.आय.ए.ने दोन दिवसांपूर्वी हिरेन कुटुंबाकडून माहिती घेतली कुटुंबाला समोर ठेवत वाझे यांच्याकडे चौकशी केल्याची केली तब्बल १३ तास चाललेल्या चौकशीनंतर एन.आय.एने सचिन वाझे यांना अटक केली. 

अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयए न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे त्यांच्या कोठडीची मागणी एन.आय.ए.कडून केली जाणार आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या