💥मुंबईत बॉडीवूड मधील अनुराग कश्यप,तापसी पन्नू,विकास बहल,मधु मंटेना यांच्यावर इन्कमटँक्सच्या धाडी...!


💥इन्कमटँक्सच्या धाडीने बॉलीवूड जगतात उडाली एकच खळबळ💥 

✍️ मोहन चौकेकर                                 

मुंबई (दि.३ मार्च) :  इन्कम टॅक्सची धाड भल्याभल्यांना धडकी भरवते. आज इन्कम टॅक्सने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवल्याचं दिसत आहे.कारण, इन्कम टॅक्सने मुंबईत अनेक बॉलिवूड कलाकारांवर धाडी टाकल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप आणि ‘क्वीन’चा निर्माता विकास बहल यांचा समावेश आहे. 


मुंबईत अनेक ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे. अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या तिघांवर 2015 मध्ये आलेल्या फँटम या सिनेमाशी संबंधित व्यवहारावरुन धाडी पडल्या आहेत. अनुराग कश्यप, विकास बहल आणि तापसी पन्नू यांच्या घरांची आयकर अधिकारी झाडाझडती करत आहेत. 

 या कलाकारांनी आयकर चोरी केल्याचा संशय आहे आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयकर विभागाकडून होत आहे.अनुराग कश्यपच्या कंपू मधील लोकांवर सध्या इन्कम टॅक्स लक्ष वेधत आहे. बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधु मंटेना यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. 

मधु मंटेनाची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानच्या कार्यालयातही प्राप्तिकर अधिकारी पोहोचले आहेत. या छापा का टाकला यामागील कारण अद्याप समोर आले नाही... 

✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या