💥परभणी जिल्ह्यात नागरी भागात सोमवार दि.१५ मार्चच्या सकाळ पर्यंत संचारबंदी लागू...!


💥जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केले आदेश जारी💥

परभणी (दि.१२ मार्च) - जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज शुक्रवार दि.१२ मार्चच्या मध्यरात्रीपासून महानगर पालिका हद्द व पाच किलोमीटरचा परिसर तसेच सर्व नगर पालिका क्षेत्रात येत्या सोमवार दि.१५ मार्च २०२१ रोजी सकाळी ०६-०० वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.


जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक यांनी मुंबईतून इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना दिलेल्या माहितीतून परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन केले जाईल. जिल्हाधिकार्‍यांशी याबाबत बोललो आहोत, असेही नमूद केले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकृत आदेशाकडे लागले होते.

जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आज शुक्रवारी दुपारी ३-२३ वाजेच्या सुमारास काढलेल्या आदेशात या संचारबंदीच्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या आहेत या काळात औषधी, किराणा, दूध  या जीवनावश्यक वस्तु अपवाद.अन्य संपूर्ण व्यवहार व बाजारपेठा पूर्णतः बंद राहतील, असे म्हटले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या