💥परभणी जिल्ह्यांतर्गत तसेच आंतरजिल्हा एसटीसह खासगी बससेवा सोमवार दि.२२ मार्च ते ३१ मार्च पर्यंत राहणार बंद....!


💥जिल्हाअंतर्गत सर्व सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीस प्रतिबंधित करण्यात आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात नमुद केले💥

परभणी (दि.२० मार्च) - परभणी जिल्ह्यांतर्गत तसेच आंतरजिल्हा  एसटीसह खासगी प्रवासी बससेवा सोमवार दि.२२ मार्च पासून ते ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्णतः बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज शनिवार दि.२० मार्च २०२१ रोजी काढले आहे.

परभणी बसस्थानकाची जागा प्रवाशांसाठी अपुरी आहे. जिल्ह्यातील इतर बसस्थानकात प्रवाशांची गर्दी व बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतुक होत असल्याने कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नमूद करीत संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आंतर जिल्हा व जिल्हाअंतर्गत सर्व सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीस प्रतिबंधित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात नमुद केले आहे.

एसटी महामंडळाची तसेच खासगी बसमधुन होणारी सर्व प्रवाशी वाहतुक सोमवार दि.२२ मार्च पासून ते ३१ मार्च २०२१ पर्यंत आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत सेवा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश बजावले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक व उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांच्यावर राहील,असेही आदेशात नमूद केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या