💥परभणी येथील पंधरा केंद्रांवर ३ हजार ९१२ परीक्षार्थी एमपीएससीची परीक्षा देणार...!


💥अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी दिली💥

परभणी (दि.२० मार्च) - राज्य सेवा (पूर्व) परिक्षा २०२० रविवार दि.२१ मार्च २०२१ रोजी परभणीतील १५ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशा प्रमाणे १५ उपकेंद्र अधिगृहीत केले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिली.

जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या केंद्रावर ३३६,(कै.) रावसाहेब जामकर माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालयाच्या केंद्रावर ३३६,(कै.) सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या केंद्रावर १६९, शारदा महाविद्यालयाच्या केंद्रावर २४०,शारदा विद्यालयाच्या (माध्यमिक) २४०,वसमत रस्त्यावरील संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालयाच्या केंद्रावर २४०,श्री शिवाजी इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज्च्या केंद्रावर २४०, श्री सारंग विद्यालयाच्या केंद्रावर २८८, (कै.) मुंजाजी विठ्ठलराव शिंदे विद्या मंदिर श्रीहरी नगर केंद्रावर २४०, शिवाजी महाविद्यालय केंद्रावर २४०,श्री शिवाजी पॉलिटेक्नीक इंस्टिट्यूट केंद्रावर २४०, नानलपेठमधील बालविद्या मंदिर हायस्कूलच्या केंद्रावर ३३६, स्टेशनरोडवरील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत २८८, शिवाजीनगरातील मराठवाडा हायस्कूलच्या केंद्रावर २४० व सुपर मार्केटजवळील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्चमाध्यमीक विद्यालयाच्या केंद्रावर २४० असे एकूण ३ हजार ९१२ परिक्षार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी या पंधरा केद्रावरील १६३ खोल्या,१५ उपकेंद्र प्रमुख ६२ पर्यवेक्षक,१७८ समवेक्षक,१८ सहाय्यक कर्मचारी व ३० शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या