💥नांदेड शहरातील वैभव नगर हडको परिसरातील पंचफुला शेषेराव क्षीरसागर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन...!


💥मातोश्री प्रतिष्ठानचे कार्यालयीन अधिक्षक बालाजी क्षीरसागर यांच्या त्या मातोश्री होत💥

नांदेड (दि.१९ मार्च) हडको वैभव नगर येथील पंचफुला शेषेराव क्षीरसागर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी वृध्दापकाळाने काल गुरुवार दि.१८ मार्च २०२१ रोजी सायंकाळी निधन झाले. पंचफुलाबाई क्षीरसागर या सर्व पाहुणे व आप्तस्वकियाना नेहमी सहकार्य करत आपलेपणा जोपासरे व मनमिळाऊ व्यक्तीमत्व होत्या त्यांनी मुलाला व मुलीला उच्च दर्जाचे शिक्षण दिले आपले कर्तव्य पार पाडले त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,सुन,नातु असा परीवार आहे.सिडको स्मशानभूमीत रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मातोश्री प्रतिष्ठानचे कार्यालयीन अधिक्षक बालाजी क्षीरसागर यांच्या त्या मातोश्री होत तर पुर्णा तालुक्यातील गौर येथील शिक्षक तथा दैनिक सकाळचे शहर प्रतिनिधी अच्युत जोगदंड यांच्या त्या मामी होत्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या