💥परभणी जिल्ह्यात सातत्याने वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव; प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा....!


💥जिल्ह्यात आज सोमवारी आढळले १४७ कोरोना बाधीत रुग्ण तर आज उपचारा दरम्यान २ कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू💥

परभणी (दि.१५ मार्च) - परभणी शहरासह जिल्ह्यात आज सोमवार दि.१५ मार्च २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल १४७ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून रुग्णालयात उपचारा दरम्यान २ कोरोनाबाधीतांना आपले प्राण गमवावे लागले आहेत मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दोन पुरूष रुग्णांचा समावेश आहे.तर रुग्णालयात औषधोपचारा नंतर कोरोनामुक्त झालेल्या २५ व्यक्तींना आज सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

दरम्यान जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासकीय निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने होत असतांना नागरिक मात्र प्रशासकीय निर्देशांचे पालन करीत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतांना पाहावयास मिळत आहे जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ४५१ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यात आजपर्यंत ३४५ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ९ हजार ४२० कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ८ हजार ६२४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७१३ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ३२ हजार ७१३ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ९ हजार २६७ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ५९४ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या