💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - सोमवारच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स...!

 


💥पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून निवडक गावांमध्ये खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करणार आमीर खानची माहिती💥 

✍️ मोहन चौकेकर 

1. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देणार नाहीत, शरद पवार यांच्याकडून देशमुखांना अभय 

2. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी; मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका 

3.  गृहमंत्री पोलिसांना 100 कोटींची खंडणी वसूल करायला सांगतात याची उच्चस्तरिय चौकशी करण्याची आवश्यकता, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, राज्यातील सद्यस्थितीची माहिती राज्यपालांनी राष्ट्रपतींना कळवण्याचंही आवाहन 

4.  पबवर कारवाई केली म्हणून निलंबन आणि पैशांची मागणी, निलंबित पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप 

5.  पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून निवडक गावांमध्ये खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करणार, आमीर खानची माहिती 

 6. परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 31 मार्चपर्यंत बस सेवा बंद;  नांदेड जिल्ह्यात 25 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत 11 दिवसांचे लॉकडाऊन 

7. कोरोना लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं, केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स; कोविशील्ड लसीचा दुसरा डोस आता दोन महिन्यानंतर 

8. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा कहर, हातात आलेल्या रब्बी पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल 

9. पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत भालके यांच्या परिवारातून उमेदवारी निश्चित तर भाजपकडून चार जण इच्छुक ; अजित पवार यांचा पंढरपूर दौरा, कोरोना नियमांचे तीन तेरा, राष्ट्रवादीच्या आयोजकांवर गुन्हा 

10. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर हिंदी, मराठी कलाकारांचं वर्चस्व ; सुशांत सिंह राजपूतचा 'छिछोरे' ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट 

✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या