💥पुर्णेतील रेल्वे गार्ड बि.के.गायकवाड यांचे दुःखद निधन.....!


💥त्यांच्या पश्च्यात दोन मुली एक मुलगा जावई असा परिवार आहे💥

पूर्णा (दि.28 मार्च) - भारतीय रेल्वे मध्ये रेल्वे गार्ड म्हणून कार्यरत असलेले बी.के . गायकवाड यांचे वयाच्या 52 वर्षी नांदेड या ठिकाणी दवाखान्यामध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी रेल्वेमध्ये रेल्वे गार्ड म्हणून कर्तव्यदक्ष पने सेवेमध्ये कार्यरत होते. रेल्वे मजदूर युनियनचे नांदेड विभागाचे कोषाध्यक्ष म्हणून अतिशय पारदर्शकपणे कारभार संभाळत होते पूर्णा येथील रेल्वे क्रीडा व सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी सचिव पदावर खूप चांगल्या पद्धतीने काम केले त्यांच्या पश्च्यात दोन मुली एक मुलगा जावई असा परिवार आहे.

त्यांच्या दुःखद निधना बद्दल बुद्ध विहार पूर्णा, मजदूर युनियन कार्यालय पूर्णा व सामाजिक राजकीय धार्मिक संघटनेच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या